जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या; पुण्यातली धक्कादायक घटना

अनिकेत आणि शुभम यांच्यात पूर्वीपासून वादविवाद व कुरबुरी सुरु होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेत व शुभम यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाले. तेव्हा शुभम व त्याच्या ४ ते ५ साथीदारानी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला.

पुणे.  जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याची हत्या  केल्याची घटना हडपसरमध्ये घडली. अनिकेत घायतडक (वय २८, रा. मांजरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत आणि शुभम हे एकाच परिसरात राहणारे आहेत. अनिकेत याच्यावर यापूर्वी मुंढवा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. अनिकेत आणि शुभम यांच्यात पूर्वीपासून वादविवाद व कुरबुरी सुरु होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात अनिकेत व शुभम यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाले. तेव्हा शुभम व त्याच्या ४ ते ५ साथीदारानी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला.

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध सुरू आहे.