पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लाभलं नवं भव्य मुख्यालय ; गिरे कुटुंबियांच्या मनात असलेली प्रेमभावना दिसली

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या प्रवासात पुण्यातील गिरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी गिरे कुटुंबीयांनी टिळक रोडवरील आपला टुमदार बंगला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठी दिला.

    पुण्यातील टिळक रोडवरच्या गिरे बंगल्यातून डेंगळे पुलाजवळील भव्य इमारतीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय (NCP Office) स्थलांतरित होत आहे. आजपर्यंत २०० स्क्वेअर फुटाच्या गिरे बंगल्यातून चालणारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार यापुढे ६,००० स्क्वेअर फुटांच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयातून चालणार आहे.

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या प्रवासात पुण्यातील गिरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी गिरे कुटुंबीयांनी टिळक रोडवरील आपला टुमदार बंगला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठी दिला.

    एवढेच नाही तर गेल्या १८ वर्षांपासून गिरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जागेचे भाडे किंवा लाईटबील यासाठी एक रुपयाही आकारलेला नाही. स्थावर मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना पुण्यातील ‘प्राईम लोकेशन’ला असलेली आपली मालमत्ता तब्बल १८ वर्षे विनामोबदला वापरण्यास देणे यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी गिरे कुटुंबियांच्या मनात असलेली प्रेमभावना दिसून येते.