कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्याची गरज; डॉ. सुभाष साळुंख यांचा सल्ला

लोणी काळभोर-: कोरोनाची साथ आटोक्यात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागेल त्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घ्यावा व त्यांना क्वारंटाइन करा वेळप्रसंगी पोलीसांची मदत घ्या. अन्यथा येणार्या काळात तुमच्या भागात कोरोना धुमाकूळ घालेल असा इशारा आरोग्य सल्लागार व भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी लोणी काळभोर येथे दिला.

  पूर्व हवेलीमधील कोरोनाची साथ रोखण्यासंदर्भात विचारविनामय करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. सुभाष साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभाग, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन यांची संयुक्त बैठक  पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. साळुंखे यांनी वरील इशारा दिला. 
  यावेळी बोलतांना डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, कोरोना बाधीत रुग्नांची मागिल सात दिवसातील संख्या लक्षात घेता, पुर्व हवेलीची स्थिती अतिशय चिंताजणक आहे. कोरोना बाधीत रुग्नाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची स्वॅब चाचनी करुन, त्यास क्वारंटाईनसक्तीचे करणे गरजेचे आहे. या शिवाय कोरोना बाधीत रुग्न राहत असलेल्या भागाला कटेंटमेन्ट जाहीर करुन, संबधित ठिकाणची काळजी घएम्याची गरज आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्नाच्या संपर्कात आलेले अनेक जण राजरोसपणे फिरत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही बाब गंभीर आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याबरोबरच, सोशल डिस्टन्स राखण्याची गरज आहे. कोरोनापासुन मुक्ती हवी असेल तर ही साखळी  तोडण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस दल, ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी मरगळ झटकून एकत्रित काम करावे लागेल. कोरोनाची साखळी तुटल्याशिवाय कोरोनापासुन मुक्ती नाही, असेही डॉ. सुभाष साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, थेऊरच्या मंडल अधिकारी गौरी तेलंग, लोणी काळभोरचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव, लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड, उपसरपंच राजाराम काळभोर, अण्णासाहेब काळभोर, योगेश काळभोर, राजेंद्र काळभोर, गणेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी डी.के पवार आदी उपस्थित होते.