खासगी रुग्णालयांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात खासगी रुग्णालयांकडून हाेणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. त्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अािण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

 पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात खासगी रुग्णालयांकडून हाेणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. त्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अािण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पुणे येथील विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई,  पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर,  साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रमकुमार,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक
उपमुख्यमंत्री पवार यंानी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणण्याचे अाव्हान असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न व्हावेत.’’
-स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे
लाॅकडाऊनची झळ बसलेल्या उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे नमूद करीत पवार म्हणाले, ‘‘ रोजगार उपलब्धेतसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत रोजगार प्रशिक्षण   देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरू करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना त्यानी सबंधित यंत्रणांना  दिल्या.’’
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार अाहे, अशी माहीती पवार यंानी िदली. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.