पुण्यात सक्रिय रुग्णाचा संख्या १० हजारांच्या खाली ; गेल्या २४ तासांत ४९४ जण काेराेनाबाधित

गेल्या चाेवीस तासांत १ हजार ४१० जण काेराेनामुक्त झाले आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजाराच्या खाली आली आहे. सध्या शहरांत ९ हजार ७२४ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी १ हजार ५९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

    पुणे : शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट हाेत असून, गेल्या चाेवीस तासांत पाचशे पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजाराच्या खाली आली आहे. पुण्यातील ३६ जणांसह एकुण ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

    शहरातील काेराेनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. यामुळे नवीन काेराेनाबाधित रुग्णांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चाेवीस तासांत ७ हजार ५८२ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये ४९४ जण काेराेना बाधित आढळून आले. चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण कमी आढळून आल्याने शहरातील पाॅझिटीव्हीटी रेट ( संसर्गाचा दर ) हा कमी झाल्याचे स्पष्ट हाेत आहे. गेल्या चाेवीस तासांत १ हजार ४१० जण काेराेनामुक्त झाले आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजाराच्या खाली आली आहे. सध्या शहरांत ९ हजार ७२४ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी १ हजार ५९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर अाॅक्सिजन पुरवठा सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही २ हजार ५८७ पर्यंत खाली आली आहे. आजपर्यंत शहरांत एकुण ४ लाख ६६ हजार ११९ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी ४ लाख ४८ हजार ३५२ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.