जुन्नर तालुक्‍याची कोरोना रुग्णांची संख्या ४३ वर

बेल्हे : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. २३) एका १६ वर्षीय युवतीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गावाची करोनाची रुग्ण संख्या ३ वर तर तालुक्‍याची संख्या ४३ वर

 

बेल्हे  : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. २३) एका १६ वर्षीय युवतीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गावाची करोनाची रुग्ण संख्या ३ वर तर तालुक्‍याची संख्या ४३ वर पोहोचली आहे. बोरी गावातील९ व्यक्‍तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८ अहवाल निगेटिव्ह आले असून या एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या युवतीवर लेण्याद्री येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. बोरी गाव व आजूबाजूचा पाच किलोमीटर परिसर प्रशासनाने सील केला आहे, अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर व बोरी गावचे तलाठी राजू बडे यांनी दिली.