आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८५

मंचरमध्ये सर्वाधिक १५ रुग्ण
मंचर  :   आंबेगाव तालुक्यात नवीन ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन एकुण रुग्णसंख्या १ हजार ८५ झाली आहे. मंचर येथे सर्वाधिक १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सोमवार दि.३१ रोजी दिली.

मंचर येथे १५, पारगांव येथे ५, अवसरी खुर्द, पेठ, महाळुंगे पडवळ येथे प्रत्येकी ४, गावडेवाडी येथे ३, शेवाळवाडी, कळंब येथे प्रत्येकी २, घोडेगांव, अवसरी बुद्रुक,  निरगुडसर, नांदुर,निघोटवाडी, पिंपळगांव खडकी, आमोंडी, चांडोली बुद्रुक, जारकरवाडी येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहेत.
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या १ हजार ८५ झाली   आहे. ३१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ६४६ रुग्ण बरे झाले असुन ४०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.