आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३६५ वर

एकाच दिवसात १९ रुग्णांची वाढ

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६५ वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी गुरुवारी सकाळी दिली. बुधवारी या एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. खडकी, एकलहरे, कानसे, निघोटवाडी, मंचर येथे प्रत्येकी एक रुग्ण, चास येथे चार रुग्ण, शिनोली येथे पाच रुग्ण, घोडेगांव येथे पाच रुग्ण असे एकुण १९ रुग्ण बुधवारी या एकाच दिवसात आढळुन आले आहेत. एकुण रुग्णसंख्या ३६५ झाली असुन २४० रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्ण सात असुन ११८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्वाच्या कामा व्यतिरिक्त बाहेर पडु नये. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे. गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले की, ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांत बाहेर गावावरुन येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील नागरिक घरात थांबणार असुन बाहेर गावावरुन गावात कोणीही येवु नये. गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करुन निर्जतुकीकरण करुन गावात स्वच्छता केली जात आहे.