पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली! चाेवीस तासांत ५०८ नवीन रुग्णांची वाढ ; पंधरा जणांचा मृत्यू

सध्या शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ५५७ जणांवर उपचार सुरु आहे. त्यापैकी २८७ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, ४२२ जणांना अाॅक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७८ हजार ५१७ जणांना काेराेनाची लागण झाली, त्यापैकी ४ लाख ६७ हजार ३७२ रुग्णांनी काेराेनावर मात केली. तर ८ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

    पुणे : शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ हाेत आहे, गेल्या चाेवीस तासांत ५०८ नवीन रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने चिंता निर्माण हाेऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत लागु केलेले निर्बंध शिथिल केले गेल्यानंतर नागरिकांकडून साेशल डिस्टन्सिंग, मास्कचा याेग्य वापर करण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. यामुळे काेराेना बाधित नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या चाेवीस तासांत ६ हजार ७०७ संशयित रुग्णांची तपासणी केली गेली. यामध्ये ५०८ नवीन रुग्ण आढळून आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पाचशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून येण्याची ही पहीलीच वेळ आहे. दुसरी लाट ओसरली नसल्याचे यातून स्पष्ट हाेत आहे. गेल्या चाेवीस तासांत २६६ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. तर शहरातील पाच जणांसह एकुण पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.