प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

बिडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह भरल्याच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. मात्र, कुणीही याच्या मदतीला आले नाही. आईला उठवून उठवून मुलगा दमला. भुकेने व्याकुळ झाला परंतु कुणीही यांच्या आसपास फिरकले नाही.

    पिंपरी : बिडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह भरल्याच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. मात्र, कुणीही याच्या मदतीला आले नाही. आईला उठवून उठवून मुलगा दमला. भुकेने व्याकुळ झाला परंतु कुणीही यांच्या आसपास फिरकले नाही.

    पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सरस्वती राजेशकुमार असं मृत महिलेचं नाव आहे. निवडणूक असल्याने तिचा पती उत्तर प्रदेशात गेला होता. ती आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा दोघेच घरी होते. मात्र, तिचा मृत्यू झाला.

    हा दीड वर्षाचा मुलगा मृतदेहासोबत खेळत होता. दोन दिवस उपाशी होता. घरात मृतदेहाशेजारी मुलगा खेळत असल्याचं पाहूनही कोणीच या मुलाला जवळ घेतले नाही. या महिलेला कोरोना झाला असावा या भीतीने कोणीही पुढे आले नाही. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
    दोन महिला पोलिसांनी या मुलाला मायेने जवळ घेतले. दूध बिस्कीट भरवले. यानंतर मृत महिलेच्या पतीला याबाबत कळवण्यात आले. पोलिसांच्या मदतीने या मुलाला शिशु गृहात ठेवण्यात आले आहे.