Modi temple in Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका पुणेकर भक्ताने मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले होते. हे मंदिर आता हटवण्यात आले. तसेच या मंदिरातील मोदांचा पुतळा देखील हटवण्यात आला आहे. या कारावाईच्या निषेधार्थ महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका पुणेकर भक्ताने मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले होते. हे मंदिर आता हटवण्यात आले. तसेच या मंदिरातील मोदांचा पुतळा देखील हटवण्यात आला आहे. या कारावाईच्या निषेधार्थ महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

    पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपाच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करून घेतला. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आले.

    15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली. मंदिराबाहेर असलेल्या फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आलाय. या मंदिरावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली. अखेरीस हे मंदिर हटवण्यात आले आहे.