परिवर्तन हेल्पलाइनकडे तक्रार आली आणि बंद सिग्नल सुरू झाले ; अडचणी उद्भवल्यास नागरिकांची परिवर्तन हेल्पलाइनकडे धाव

सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे वाहनांची ये-जा करताना अडचण होत होती.वाहतुकीला कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील होत होती.या शिवाय नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

    पिंपरी: पुणे-नाशिक महामार्गावरील उपबाजार समिती चौकात काही दिवसांपूर्वी जुने सिग्नल दिवे काढून नवीन सिमल बसविण्यात आले. परंतु काही दिवसांपासून ते बंद होते याबाबत काही नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन हेल्पलाइन कडे तक्रार केली तक्रार आल्यानंतर काही तासातच हे सिग्नल सुरू झाले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    पुणे-नाशिक महामार्गावरील उपबाजार समिती चौकात काही दिवसांपूर्वी जुने सिग्नल दिवे काढून नवीन सिमल बसविण्यात आले. परंतु काही दिवसांपासून ते अचानक बंद झाल्यामुळे येथे अपघातात वाढ झाली होती. सिग्नल बंद असल्यामुळे अनेकदा स्थानिक नागरीक, बाजार समितीत येणारे ग्राहक, महिला, मुले, वयोवृद्ध नागरिक यांना हा महामार्ग ओलांडून जाणे जीवावर बेतणारे होते. यामुळे येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने संपूर्ण सिग्नल यंत्रणा नव्याने उभारली व ती सुरळीत व नियंत्रित होती. ही यंत्रणा काही दिवस सुरू ठेवली व नंतर अचानक बंद करण्यात आली.

    सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे वाहनांची ये-जा करताना अडचण होत होती.वाहतुकीला कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील होत होती.या शिवाय नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे काही नागरिकांनी पुढाकार घेत परिवर्तन हेल्पलाइनकडे दाद मागितली. परिवर्तन हेल्पलाइनकडे याबाबत तक्रार आल्यानंतर तातडीने सूत्रे हलवण्यात आली.संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत ही सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी नागरिक या सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.