बारामतीकरांनी अनुभवला जलप्रलय

बारामती : बारामती शहर व तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरीकांनी जलप्रलय अनुभवला.गेल्या अनेक वर्षात झाला नसेल,एवढा पाऊस नागरीकांनी अनुभवला.या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले,तर अनेक सदनिकांच्या इमारती पाण्यामध्ये गेल्या आहेत.रस्ते नद्यांप्रमाणे वाहिल्याने मुख्य मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली.शेतीचे तर अपरिमित नुकसान झाले आहे. बारामती शहरासह परीसरातील अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत,त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

बारामती : बारामती शहर व तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरीकांनी जलप्रलय अनुभवला.गेल्या अनेक वर्षात झाला नसेल,एवढा पाऊस नागरीकांनी अनुभवला.या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले,तर अनेक सदनिकांच्या इमारती पाण्यामध्ये गेल्या आहेत.रस्ते नद्यांप्रमाणे वाहिल्याने मुख्य मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली.शेतीचे तर अपरिमित नुकसान झाले आहे.
बारामती शहरासह परीसरातील अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत,त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ग्रामीण भागातील अनेक भागातील शेतजमिनी वाहून गेल्या आहेत
बारामती शहरातील जळोची भागात मलगुंडे वस्ती येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सुमारे सव्वाशे नागरीकांच्या घरात पाणी शिरले असून,या नागरीकांना बारामती नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.दरम्यान या नागरीकांच्या घरातील,धान्य,कपडे,भांडी तसेच इतर संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे.तांदुळवाडी भागातील शारदानगर,शिवनगर,पंचशीलनगर,खंडोबानगर,पतंशाहनगर या भागातील अनेकांच्या घरात पाणी गेल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे.शहरातील विविध रहिवाशी सदनिकांच्या इमारतीमधील पार्किंग मध्ये पाणी साचले आहे.शहरातील साईगणेशनगर,तांबेनगरमधील सर्व इमारती पाण्यामध्ये आहेत.गेली अनेक वर्षानंतर प्रथमच हा प्रलयकारी पाऊस झाला, विविध राज्यमार्ग जलमय झाले.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली.कर्हा व नीरा नदीला पूर आला आहे.बारामती शहरातील विविध रस्त्यांना पुराचे स्वरुप आले,यामध्ये शहरातील अमरदिप हाॅटेलजवळील बारामती-भिगवण रस्त्यावर पुरस्थिती निर्माण झाली होती,त्यामुळे चारचाकी वाहने पाण्यावरतरंगत होती.बारामती नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी दोराच्या सहाय्याने ही वाहने ओढून बाजूला केली.या सह इतर रस्त्यांवर पाणी साचल्याने नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता फोडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करुन दिली.

तालुक्यातील ओढे व नाले दुथडी भरून वाहत आहेत.अनेकांच्या घरात पाणी गेले आहे.बारामती-इंदापूर,बारामती-कुरकुंभ ,बारामती-मोरगाव,बारामती- भिगवण या राज्य मार्गावर अनेक ठिकाणी पूराचे स्वरुप आल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.बारामती-इंदापूर या मार्गावरील सणसर येथील ओढ्याला महापूर आल्याने पुरावरुन पाणी जात होते.सणसर येथील ओढ्यालगतच्या अनेकांच्या घरात पाणी गेले आहे.काहींची घरे वाहून गेली. यामध्ये घरातील धान्य,भांडी व इतर साहित्य वाहून गेले आहे.

बारामती शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुराचे स्वरुप आले होते.बारामती शहरातील श्रीरामनगर जवळ बारामती-भिगवण मार्गही पाण्यामुळे बंद होता.बारामती नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी या रस्त्यातील दुभाजक फोडून पाणी बाहेर काढले.शहरातील कर्हा नदीला पुर आल्याने या नदीवरील दोन्ही पुलांची वाहतुक बंद करण्यात आली आहे.बारामती शहरात ठिकठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरुप आले होते.बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसिलदार श्रीकांत पाटील,मुख्याधिकारी किरणराज यादव,गटविकास अधिकारी काळभोर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व इतर नगरसेवकांनी रात्रभर विविध ठिकाणांना भेटी देवून पाहणी केली.बारामती नगरपालिकेचा अतिक्रमण, आरोग्य,उद्यान,अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी नागरीकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले.

सांगा कसं जगायचं?
बारामती शहरातील जळोची मलगुंडे वस्ती,पंचशीलनगर,खंडोबानगर याठिकाणी अनेकांच्या घरात पाणी गेले आहे.सणसर(ता इंदापूर)येथील झोपडपट्टीतील अनेकां च्या घरात पाणी गेल्याने घरातील धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत,याठिकाणची तीन घरे वाहून गेली आहेत.मोलमजुरी करुन उभा केलेला संसार पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशी सांगा कसं जगायचं?हा सवाल व्यक्त करत आहेत.