पुण्यात सेनेचा महापौर व्हावा, अशी जनतेची इच्छा ; खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य 

अनेक वेळा चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्या भेटीगाठी पण झाल्या. भाजप व मनसे युती होईल अशी चर्चा सुरू आहे त्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांना कोणा बरोबर युती करायची ते तेच ठरवतील असे संजय राऊत म्हणाले.

    पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकिमध्ये शिवसेनेचा महापौर बसावा असे शिवसेनेचे स्वगिय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.अजुन ती इच्छा पूर्ण झाली नाही .येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा महापौर होईल अशी जनतेची इच्छा आहे. ती आम्ही इच्छा पूर्ण करू असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात आले असता पत्रकारांना आपली इच्छा बोलून दाखवली.

    काही दिवसापूर्वी भाजप मनसे च्या युतीची चर्चा चालू होती
    अनेक वेळा चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्या भेटीगाठी पण झाल्या. भाजप व मनसे युती होईल अशी चर्चा सुरू आहे त्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांना कोणा बरोबर युती करायची ते तेच ठरवतील असे संजय राऊत म्हणाले.देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. असे त्यांना स्वप्न पडते असे स्वप्न पाहत राहावे ही शुभेच्छा असे संजय राऊत म्हणाले.