पुण्यात लावलेल्या या प्रॉपर्टीच्या जाहिरातीचा फोटो झाला व्हायरल, लोकं विचारत आहेत- 0.25 BHK किती रे भाऊ?

या प्रॉपर्टीच्या जाहिरातीचं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलेलं आहे. या प्रॉपर्टीच्या जाहिरातीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही जाहिरात लोकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. जाहिरातींच कामच हे आहे की, ग्राहकाला स्वत:कडे आकर्षित करणं पण ही जाहिरात जरा हटके आहे. ज्यामुळे लोकांना हसू आवरत नाहीये.

    पुणे : रस्त्याने येता जाता अनेक प्रॉपर्टीच्या मोठ-मोठ्या जाहिरातींचे (Property Ad) होल्डिंग्स आपल्या दृष्टीस पडत असतात. प्रॉपर्टी सेलच्या (Property Sale) अनेक जाहिराती समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक अजब-गजब पद्धतीची प्रॉपर्टीच्या जाहिरातीचा फोटो व्हायरल (Photo Viral) होतो आहे. ज्यात प्रॉपर्टीच्या या जाहिरातीत (Property Ad) 2.3 किंवा 4 BHK च्या जागी 0.25 BHK लिहिलेलं आहे.

    या प्रॉपर्टीच्या जाहिरातीचं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलेलं आहे. या प्रॉपर्टीच्या जाहिरातीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही जाहिरात लोकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. जाहिरातींच कामच हे आहे की, ग्राहकाला स्वत:कडे आकर्षित करणं पण ही जाहिरात जरा हटके आहे. ज्यामुळे लोकांना हसू आवरत नाहीये.

    फोटो पाहून युजर्स याची मजा घेत आहेत. फोटोत तुम्ही पाहू शकता की, जाहिरातीत (Property Ad) 2.3 किंवा 4 BHK च्या ऐवजी 0.25 BHK लिहिलं आहे. यामुळेच लोकांसाठी ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रॉपर्टीच्या जाहिरातीतील फोटो ट्विटरवर समीर नायर नावाचा अकाऊंटवरून शेअर केला आहे.

    सोबतच कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, एक 0.25 BHKचं घर किती मोठं असणार आहे? आणि हा नियो कॉस्मोपॉलिटन कोण आहे? फोटोवर लोकं मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.

    the photo of the advertisement of this property in pune went viral people said how much is 0 25 bhk