चंदनचोर मोकाटच..! गुन्ह्यांचे पोलीसांना अन तक्रारदारांनाही गांभीर्य नाही ; चंदन चोऱ्या भरमसाठ पण उघड तुरळकच

चंदनाची झाडे तशी तुरळकच आहेत. परंतु, पुण्यासह जिल्ह्यात त्याचे प्रमाण जास्त आहे. टेकडी परिसर व झांडी यामुळे झाडे येतात. चंदनाच्या झाडामधील गाभ्याला किंमत असते. त्याला औषधी गुणधर्म आहे; तसेच त्याचा वापर हा सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने निर्मिती करण्यासाठी केला जातो. विशेषत बॉडी-स्प्रेमध्ये ते वापरले जाते.

  अक्षय फाटक, पुणे : पुण्यातील महत्वाच्या ठिंकाणांवरून होत असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरीचे गांर्भिय तक्रारदार अन पोलीसांनाही नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे भरमसाठ होणाऱ्या चंदनचोरीमधील “चंदनचोर” मोक्काटच असल्याचे पाहिला मिळत आहे. निम्म्याहून अधिक गुन्हे उघडकीस येत नसल्याचे पोलीसांच्याच आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे चंदन चोरांचा सुकाळ असल्याचे दिसत आहे. परंतु, महत्वाच्या आणि शासकीय ठिकाणांमधून चंदन चोरीला जात असल्याने तेथील सुरक्षा देखील किती कडेकोट असेल याचा अंदाज येत आहे.

  शहरात अनेक सरकारी कार्यालये, संस्था, जुन्या सोसायटी, ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तर, अनेक टेकड्या असून, झांडाचा परिसर देखील मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात चंदनाची झाडे येत आहेत. तस चंदनाची झाडेकमीच आहेत. परंतु, पुण्यासह जिल्ह्यात त्याचे प्रमाण त्यामानाने लक्षणीय आहे. मात्र, या झाडांवर चंदन चोरांची हुकूमत असल्याचे पाहायला मिळत आहे. चंदनाचे झाडे चोरण्यायोग्य झाल्यानंतर बरोबर ते चोरीला जाते. चंदन चोर केवळ झाडातील गाभाच काढून नेतात. त्यामुळे चोरट्यांनी कापण्यासाठी गाभा काढण्यासाठी इतका वेळ मिळतो, कसा अन ते बिंदास घेऊन जातात कसे असा प्रश्न आहे.

  अनेक प्रकरणात साठेलोठे झालेले असते, असे देखील खासगीत काही जानकर अधिकारी सांगतात. परंतु, तेरी भी चूप अन मेरी भी चूप, मुळे चोरट्यांचे फावते. आश्चर्य म्हणजे सुरक्षाव्यवस्था चोख आहे, अशा ठिकाणीदेखील चंदनाची झाडे चोरीला जातात. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. त्यासोबतच चंदनाची झाडे आहेत, हे समजतेच कसे असा प्रश्न देखील समोर आहे. अनेकवेळा चोरटे दिवसा फिरून ही झाडे हेरून ठेवतात आणि रात्री त्याची चोरी होते. तर, अनेकवेळा हे चोरटे त्यातील तेल काढून देतो, असे म्हणून संबंधित व्यक्तींना सांगतात. त्या झाडाची पाहणी करतात. पोलीसांकडेही हे जाऊन आम्ही नियमाने काम करत असल्याचे सांगतात. परंतु, शेवटी हे झाड चोरीलाच जाते.

  दरम्यान, दुसरीकडे चंदन झाडाची चोरी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून नियमानुसार पोलीसांकडे तक्रार केली जाते. पोलीसही त्याप्रमाणे गुन्हा दाखलकरून मोकळे होतात. मात्र, पुढच्या तपासाला व कार्यवाहीला तितके गांर्भिय नसते. तक्रारदारच विचारपूस करण्यास पुन्हा येत नसल्याचे पोलीसही त्यासकडे गांर्भियाने पाहत नाहीत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा फायदा चंदन चोरांना होतो. पोलीसांना हे गुन्हे रोखण्यास अपयश तर येत आहेच. परंतु, पोलीस हे गुन्हे उघड करण्यास देखील अपयशीच आहेत. शहरात प्रत्येक वर्षी वीस ते पंचवीस गुन्हे दाखल होत असून, या गुन्ह्यात ४० ते ५० झाडे चोरीला जात आहेत. शहरात सप्टेंबरपर्यंत चंदन चोरीचे १४ गुन्हे दाखल झालेले आहेत.

  गेल्या काही महिन्यांत आर्म फोर्सेस मेडिकल स्टोअर, खडकी दारूगोळा कारखाना, औंध येथील जिल्हा पशुवैद्यकीय, चिकित्सालय, राज्य राखीव पोलीस बल, लष्कराच्या भागातील दोन क्वार्टर्स, रांजीव गांधी प्राणी संग्राहालय, लोहगाव येथील विखे पाटील मेमेरियअल स्कूल अशा महत्वाच्या ठिकाणीच चोऱ्या झाल्या आहेत.

  गाभाच गायब होतो…
  चंदनाची झाडे तशी तुरळकच आहेत. परंतु, पुण्यासह जिल्ह्यात त्याचे प्रमाण जास्त आहे. टेकडी परिसर व झांडी यामुळे झाडे येतात. चंदनाच्या झाडामधील गाभ्याला किंमत असते. त्याला औषधी गुणधर्म आहे; तसेच त्याचा वापर हा सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने निर्मिती करण्यासाठी केला जातो. विशेषत बॉडी-स्प्रेमध्ये ते वापरले जाते. चंदनाच्या लाकडाच्या भुश्शाचा उदबत्ती बनविण्यासाठी वापर होतो. त्यामुळे चंदनाच्या झाडाला मोठी मागणी आहे. शहरात या झाडांची संख्या मोठी असून, जुन्या संस्थांच्या आवारात चंदनाची झाडे शिल्लक आहे. या झाडांना भाव वाढल्याने चंदनाच्या तस्करीत वाढ झाली आहे, असे पोलीस सांगतात.

  एजंट कार्यरत…
  शहर व जिल्ह्यातून चोरले जाणारे चंदन नगर व सोलापूरपर्यंत जात आहे. जेजूरी, बारामती, फलटण, सांगोला, सोलापूर या भागातील एका विशिष्ट जातीच्या लोकांकडून चंदन चोरी होते, असल्याचे एका जानकर अधिकाऱ्याने सांगितले. या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चंदन तस्कर असल्याचे गेल्या काही कारयांमध्ये दिसून आले आहे. चंदन खरेदीसाठी ऐजंट देखील असून, ते या चंदन चोरांकडून झाडे घेतात. त्यानंतर ते पुढे विकले जातात. चंदनाची विक्री गुजरात व उत्तरेकडील राज्यात केली जात असल्याचे काही वेळा दिसून आले असल्याचे पोलीसांनी सांगितले.

  वर्ष–उघड–दाखल
  २०१६ – १२–१६
  २०१७ – ०८/१५
  २०१८ – १०/१६
  २०१९ – ०७/१२
  २०२० – ०५/०८
  सप्टेंबर २०२१ – ०३/१४