भोसरीत गुन्हेगाराला अटक करायला गेलेल्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

गणेश सावंत आणि त्यांचे सहकारी सुमीत देवकर हे दोघेजण अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावजत्रा मैदान येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.

    पिंपरी: गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे घटना गावजत्रा मैदान येथे घडली आहे केले. तसेच  सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी दोन जणांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शाहनवाज नाजीर बेग (वय ४१) आणि शौकत नजीर बेग (वय ४२, दोघेही रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश सावंत आणि त्यांचे सहकारी सुमीत देवकर हे दोघेजण अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावजत्रा मैदान येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. तसेच पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.