माळेगावची प्रज्ञा काटे राज्यभरातल्या कोरोना रुग्णांसाठी ठरलीय आरोग्यदूत ; सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्तापर्यंत दीड हजार रुग्णांना मिळवून दिला प्लाज्मा

बारामती तालुक्यातल्या माळेगाव खुर्द येथील प्रज्ञा काटे. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात बीएस्सीच्या तृतीय वर्षांत शिकणारी विद्यार्थिनी. सध्या ती राज्यभरातील लोकांची आरोग्य दूत बनली आहे. प्रज्ञा आणि तिच्या टीमने आतपर्यंत राज्यातील विविध भागांतील दीड हजार पेक्षा जास्त कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाज्मा दान करायला लावला आणि तेवढ्याच गरजू रुग्णांना मिळवून देखील दिलाय. विषेश म्हणजे हे सगळं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केलय.

  माळेगाव : कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक जण एक दुसर्‍याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर्स, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. अशा आणीबाणीच्या काळात खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून प्रज्ञा काटे आरोग्य दूत म्हणून काम करतेय. रात्रीचा दिवस करुन या आणीबाणीच्या काळात प्रज्ञा आणि तिची टीम कोरोना रुग्णांना प्लाज्मा उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत त्यांनी १५०० पेक्षा जास्त लोकांना प्लाज्मा मिळवून दिला आहे.

  बारामती तालुक्यातल्या माळेगाव खुर्द येथील प्रज्ञा काटे. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात बीएस्सीच्या तृतीय वर्षांत शिकणारी विद्यार्थिनी. सध्या ती राज्यभरातील लोकांची आरोग्य दूत बनली आहे. प्रज्ञा आणि तिच्या टीमने आतपर्यंत राज्यातील विविध भागांतील दीड हजार पेक्षा जास्त कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाज्मा दान करायला लावला आणि तेवढ्याच गरजू रुग्णांना मिळवून देखील दिलाय. विषेश म्हणजे हे सगळं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केलय.

  सध्या प्रज्ञा बारामतीतील भोईटे हॉस्पिटल मध्ये रूग्ण सेवा करते आहे. शासनाच्या वतीने गरीब लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन त्यांना मदत करण्याचे काम प्रज्ञा करतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झालीये. रुग्णांना बेड मिळत नाही. त्यामुळे नातेवाईक हतबल होतात. तसेच रुग्णांचे खच्चीकरण होतं. त्यावेळी त्यांचे अश्रू पुसण्याचे काम प्रज्ञाच्या माध्यमातून होतेय.

  लहानपणापासून प्रज्ञाला समाज कार्याची आवड आहे. या सामाजिक कार्याला तिला घरच्यांचा देखील पाठिंबा आहे. पण कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी घरच्यांचा तिला विरोध होता. पण प्रज्ञाच्या कोविड रुग्णांसाठी काम करण्याच्या जिद्दीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. प्रज्ञाला घरच्यांनी परवानगी दिल्यानंतर प्रज्ञा ने केलेल्या कामामुळे तिच्या पालकांचीव देखील छाती अभिमानाने फुगली आहे.

  खरं तर कोरोनामुळे लोक घराबाहेर पडायला घाबरतात. परंतु प्रज्ञा त्याला अपवाद ठरलीय. आपल्या जीवाची परवा न करता ती रुग्ण सेवा करते आहे. तिच्या आणि तिच्या टीमच्या कार्यामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळाले आहे. ही गोष्ट छोटी आहे, पण डोंगराएवढी.

  गेल्या वर्षी प्रज्ञाच्या काकांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना वेळेत बेड मिळाला नव्हता आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. या काळात त्यांच्या कुटुंबातील लोकांची जी फरफट झाली ती दुसऱ्या कुणाची होऊ नये, म्हणून प्रज्ञाने स्वतःला या आणीबाणीच्या काळात रुग्ण सेवेत वाहून घेतलेय.