जेजुरीच्या पारंपरिक बाजारात झेंडूला  ७०  रुपये किलो भाव ; फुलांची आवक कमी ,व्यापारी नाराज

जेजुरीत दसऱ्याअगोदर तीन दिवस झेंडूचा बाजार भरतो, बुधवारपासूनच येथे पुणे, मुंबई, ठाणे ,अलिबाग येथून झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी आले आहेत. मात्र माल कमी आल्याने  त्यांची निराशा झाली झेंडूला भाव प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये किलो टिकून राहिला .आपल्या दुचाकीवरून, टेम्पोमधून अनेक शेतकरी फुले घेऊन विक्री करण्यासाठी आले होते .गुरुवारी खंडेनवमी असल्याने आज  खरेदी झालेली फुले पुण्या-मुंबईकडे रवाना झाली. राज्यातील बहुतांशी कारखान्यामध्ये खंडेनवमीला मशिनरीची पूजा केली जाते

    जेजुरी : साऱ्या महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील पारंपारिक झेंडु बाजारात आज  ६०ते ७० रुपये किलो  दराने  व्यापाऱ्यांनी फुले खरेदी केली. यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने जिरायत क्षेत्रांमध्ये झेंडूची लागण होऊ शकली नाही ,तर बागायत  क्षेत्रातील झेंडूचे फड फुललेले असताना मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी झेंडूची फुले कमी प्रमाणात आली.
    जेजुरीत दसऱ्याअगोदर तीन दिवस झेंडूचा बाजार भरतो, बुधवारपासूनच येथे पुणे, मुंबई, ठाणे ,अलिबाग येथून झेंडू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी आले आहेत. मात्र माल कमी आल्याने  त्यांची निराशा झाली झेंडूला भाव प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये किलो टिकून राहिला .आपल्या दुचाकीवरून, टेम्पोमधून अनेक शेतकरी फुले घेऊन विक्री करण्यासाठी आले होते .गुरुवारी खंडेनवमी असल्याने आज  खरेदी झालेली फुले पुण्या-मुंबईकडे रवाना झाली. राज्यातील बहुतांशी कारखान्यामध्ये खंडेनवमीला मशिनरीची पूजा केली जाते आणि यासाठी झेंडूची गरज लागतेच ,त्यामुळे येथे तीन दिवस बाजार भरतो लाखो रुपयांची उलाढाल होते. झेंडूला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता .बाजारात यलो गोल्ड, गोल्ड स्पॉट, कलकत्ता,  गोंडा आदी जातीची फुले विक्रीसाठी आली होती. मालाचा तुटवडा व मागणी जास्त यामुळे झेंडूचे भाव खाली आले नाहीत .दसरा- दिवाळीला हक्काचे पैसे मिळवून देणारे पीक म्हणून  तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करतात ,परंतु यंदा पावसाने दगा दिल्याने झेंडू लागवडीवर परिणाम झाला. गुरुवारी दिवसभर बाजार सुरूच राहणार असून झेंडूचे भाव कडकच राहण्याची शक्यता आहे.