कुरकुंभ येथे खाजगी डांबर खडी मिश्रण प्रकल्पाला महसूल विभागाने ठोकले टाळे

कुरकुंभ : कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीत कुरकुंभ -दौंड रस्त्यावर पी.एस.के इन्फ्रास्ट्रक्चर अँण्ड प्रोजेक्ट प्रा.ली. या खाजगी कंपनीच्या डांबर खडी मिश्रण प्रकल्पला बुधवार (ता.१७)

कुरकुंभ :  कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीत  कुरकुंभ -दौंड  रस्त्यावर पी.एस.के इन्फ्रास्ट्रक्चर अँण्ड प्रोजेक्ट प्रा.ली. या  खाजगी कंपनीच्या डांबर खडी मिश्रण प्रकल्पला बुधवार (ता.१७) रोजी महसूल विभागाने टाळे ठोकले, 

पी.एस.के इन्फ्रास्ट्रक्चर अँण्ड प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीचे पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी या कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीत  कंपनीने खडी डांबर मिक्सिंग प्लांट उभा केला आहे . या प्रकल्पासाठी  कुरकुंभ ग्रामपंचायतची ना हरकत  दाखला घेतला नसल्याचे या संदर्भात दौंड तहसीलदार यांना ग्रामपंचायतने  लेखी पत्रव्यवहार केला होता की संबंधित कंपनीने प्रकल्पासाठी ना हरकत परवान्यासाठी ग्रामपंचायतीकडे मांगणी केली होती त्यानुसार ग्रामपंचायतीने कंपनीस आवश्यक ती कागदपत्रे कंपनीला सादर करण्यास कळविले होते. परंतु त्या अगोदरच संबंधित कंपनीने कंपनी सुरू केली आहे. सदरच्या कंपनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असून ते गावामध्ये अत्यंत घातक आहे तरी आपण सदर ची कंपनी तात्काळ बंद करावे असे लेखी पत्रव्यवहार दौंड तहसीलदार यांना केला होता. याची दखल घेत महसूल मंडलाधिकारी यांनी  या कंपनीवर धडक कारवाई करत कंपनी बंद केली आहे.या कारवाईत या प्लांट वर अनधिकृत पणे असलेला सतराशे ब्रास खडीचा साठा ताब्यात घेऊन  यावर धडक कारवाई करत या कंपनीवर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी  पाटस मंडलाधिकारी राजेंद्र म्हस्के यांनी  दौंड तहसीलदार संजय पाटील यांना अहवाल सादर केला असल्याचे दैनिक नवराष्ट्र शी बोलताना म्हस्के यांनी  सांगितले. या कारवाई वेळी पाटस मंडलाधिकारी राजेंद्र म्हस्के, गावकामगार तलाठी संतोष इडूळे, आदी कर्मचारी  या कारवाईत उपस्थित होते.