रक्षकच बनला भक्षक! बलात्कार प्रकरणात पोलिसालाच पोलीस कोठडी

लग्नाचे अमिष दाखवून, तर त्यानंतर २० मे २०२१ पर्यंत लग्न झाले आहे, असे सांग़ून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला न्यायालयात हजर केले.

    पुणे :  लग्नाचे अमिष आणि काही काळ तर लग्नच झाले आहे, असे सांगून तरूणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी दिला. संदीप बळीराम वाघमारे (वय २९, रा. वरळी पोलीस मुख्यालय, मूळ. रावण कोळा, ता. जळकोट, जि. लातुर) असे पोलीस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

    याबाबत २७ वर्षीय तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ४ जानेवारी ते १७ जुलै २०२० या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवून, तर त्यानंतर २० मे २०२१ पर्यंत लग्न झाले आहे, असे सांग़ून त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच वाघोली, कांजुरमार्ग, लातुर, पनवेल या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तेथे जावून तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली.