प्रिस्टीन ग्रीनच्या पार्किंगचा प्रश्न अखेर सुटला; आमदार महेश लांडगेच्या मध्यस्थीला यश

प्रिस्टीन ग्रीन मधील सुमारे १९० सदनिकाधारकानांच पार्किंगची सुविधा दिली होती. या मध्ये दुचाकी, सायकल पार्किंगची सुविधा नव्हती. त्याबाबत सोसायटी सभासद वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती.

पिंपरी: मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीच्या पार्किंगचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. त्याबाबत नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न निकाली काढला आहे. संबंधित बिल्डरला आमदार लांडगे यांनी कोणाचेही नुकसान न होता प्रश्न सोडविण्याची सुचना दिली. त्यानुसार प्रत्येक सदनिका धारकांना पार्किंगची सुविधा देण्याचे बिल्डरकडून मान्य करण्यात आले. सोसायटी सभासदांनी याबाबत आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले आहे.

मोशी येथील प्रिस्टीन ग्रीनच्या ४ इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित इमारतींचे काम चालूच आहे. या ठिकाणी ३८८ सदनिकाधारक आहेत. या सदनिकाधारकांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. नियमानुसार सदनिकाधारकांना पार्किंगची सोय करायची असते. मात्र प्रिस्टीन ग्रीन मधील सुमारे १९० सदनिकाधारकानांच पार्किंगची सुविधा दिली होती. या मध्ये दुचाकी, सायकल पार्किंगची सुविधा नव्हती. त्याबाबत सोसायटी सभासद वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती.

त्यामुळे सोसायटीच्या सभासदांनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपली समस्या मांडली. त्यानुसार आमदार लांडगे यांनी सर्व बाजू एकूण घेऊन तत्काळ हा प्रश्न सोडविला. संबंधित बिल्डरला आमदार लांडगे यांनी सुचना देत कोणाचेही नुकसान न करता प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे बिल्डरकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक सदनिकाधारकाला पार्किंगची सोय देण्याचे मान्य केले.

तसेच, सोसायटीधारकांच्या काही समस्या असतील तर माझे कार्यालयीन प्रतिनिधी शिवाजी घाडगे (९३२५५०५५०५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे. आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी केल्यानेच हा प्रश्न सुटल्याची भावना सोसायटी सभासद व्यक्त करत आहेत. तसेच दीड वर्षांचा प्रश्न सुटल्याने सोसायटी सभासदांनी आभार मानले आहेत.

याबाबत प्रिस्टीन ग्रीन्स सोसायटीचे सदस्य संजय गोरड म्हणाले की, नियमानुसार पार्किंग देण्याची सोय असतानाही आम्हाला दिले नव्हते. दुचाकी व सायकलचीही सुविधा नव्हती. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही प्रश्न मांडले. त्यांनी त्वरित हा प्रश्न सोडविला. चिखली, मोशी, चऱ्होली हौसिंग सोसायटीचे सचिव संजीवन सांगळे म्हणाले की, दीड वर्ष आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो. विषय जटील होऊन बसला होता. महापालिकेकडेही आम्ही पाठपुरावा केला. मात्र हा प्रश्न सुटला नव्हता. त्यांतर आमदार महेश लांडगे यांना आम्ही भेटलो. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रतेक सदनिकाधारकाला पार्किंग उपलब्ध करण्यात आले.