महानगरपालिका लिंकरोड ‘झो पु’ इमारतीच्या दुरूस्तीची कामे लवकरच मार्गी लागणार ; सव्वाचार कोटीचा खर्च येणार

शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड येथे पॅकेज क्रमांक सात अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड येथील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सव्वाचार कोटी रूपये खर्च होणार आहेत.

    शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड येथे पॅकेज क्रमांक सात अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेतर्पेâ ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी ४ कोटी ९७ लाख ४७ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून ४ कोटी ९७ लाख २१ हजार रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा १५.७७ टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच ४ कोटी १८ लाख ८० हजार रूपये अधिक मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी २५ हजार रूपये असे एवूâण ४ कोटी १९ लाख रूपये खर्च होणार आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी या कामांची निविदा स्विकारण्यास ६ जून रोजी मान्यता दिली आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.