शिरूरकरांसाठी खूशखबर! कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या त्या ४३  जणांचा अहवाल निगेटिव्ह

शिरूर: शिरूरमध्ये प्रितम प्रकाशनगर,जोशीवाडी व अण्णापुर ता.शिरूर येथील कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सर्व ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे

शिरूर:  शिरूरमध्ये प्रितम प्रकाशनगर,जोशीवाडी व अण्णापुर ता.शिरूर येथील कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सर्व ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.

       

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले कुटुंबिय,नातेवाईक,डाॅक्टरांसह इतरांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरूरकरांना दिलासा मिळाला आहे.मुंबईवरून शिरूरला प्रितम प्रकाशनगर येथे आलेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील तसेच जोशीवाडी परिसरातील व अण्णापुर येथील अशा तीनही बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सर्व ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.शहरातील तीनही बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्दी,खोकला व ताप असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शासकीय रूग्णालयांत उपचार करून घ्यावे त्याचबरोबर प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शिरूर ग्रामीण रूग्णालयाचे डाॅ.तुषार पाटील यांनी केले आहे.