खामगांव फाटा ते गाडीमोड रस्ता बनला धोकादायक

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; अपघातांचे प्रमाण अधिक वाढले
यवत : रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी दैनीय अवस्ता झाली आहे. खांमगाव फाटा ते गाडीमोडी  रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. खड्डे तातडीने बुजवन्यात यावेत.अशी मागनी होत आहे. सध्या पाऊसाचे दिवस सुरू आहे. या रस्यावर फुट फुट खोल खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे गाडीमोड ते खांमगाव फाटा येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली असुन जागोजागी खड्डे पडले आहेत. खामंगाव फाटा ते गाडीमोडी रोड वर पिंगळेवस्ती या ठीकानी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात ही झाले आहेत. वाहन चालकांना तसेच काही वाहन चालक खड्डा चुकवीताना अपघात होवुन गंभीर जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होवुन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कायम या रस्त्याच्या कामाकडे डोळे झाक करीत आहे.