धामारीत शासनाच्या नियमांचा उडाला फज्जा

शिक्रापूर : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना शासनाने विविध नियम लादलेले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिलेले आहे, मात्र काही ठिकाणी या नियमांचा नागरिकांकडून फज्जा उडाला असल्याचे दिसत असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

-शासकीय नियमांचे उल्लंघन
शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी यापूर्वी असे प्रकार घडलेले असून यापूर्वी शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली, कोरगाव भीमा, शिक्रापूर या ठिकाणी यापूर्वी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. तर यापूर्वी चक्क एका सभापती असेच जिल्हा परिषद सदस्या आर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. मात्र अलीकडील काळात कोरोनाचा फैलाव होत असताना अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा जास्त प्रमाणात धोका होत असल्याची माहिती देखील आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. चार दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे गर्दी करून सत्कार ककेल्या प्रकरणी चाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तरी देखील धामारी (ता. शिरूर) येथे पाणी पुरवठा योजनेचे पूजन व उद्घाटन करण्यात आले मात्र यावेळी जास्त जेष्ठ नागरिकांचा समवेश करण्यात आलेला होता तर कोणत्याही जेष्ठ नागरिकांचे तोंडावर मास्क अथवा रुमाल लावलेला नव्हता तसेच गर्दी करून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले, त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे गांभीर्य आहे कि नाही याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

– पोलीस कारवाई करणार का?
यापूर्वी शिरूर तालुक्यात एका सभापती यांच्या मिरवणुकीवर, उपसरपंचांच्या सत्कारावर, वाढदिवस पार्टीवर, लग्नावर कारवाई करणारे पोलीस यावर कारवाई करून नागरिकांवर वचक बसविणार कि राजकीय दबावाला बळी पडणार असा सवाल नागरिकांना पडला आहे.