अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीने  घरकुल योजनेची वाळू गेली पाण्यात !

कर्जत : शासनाने प्रत्येक नागरिकाला सन 2021 पर्यंत हक्काचे आणि पक्के घर देण्याचा संकल्प केला असून त्या माध्यमातून घरकूल बांधण्याच्या अनेक योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यांपैकी 'रमाई

कर्जत  : शासनाने प्रत्येक नागरिकाला सन 2021 पर्यंत हक्काचे आणि पक्के घर देण्याचा संकल्प केला असून त्या माध्यमातून घरकूल बांधण्याच्या अनेक योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यांपैकी  ‘रमाई आवास’ योजनेला  मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र कर्जत तालुक्यांतील अधिकार्‍यांच्या टोलवाटोलवीने हजारो  बांधवांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरे झाले आहे.

ग्रामीण  व शहरी भागातील लोकांना ‘रमाई आवास’ योजनेंतर्गत घरकूल देण्याची योजना आहे.मात्र, सध्या जिल्ह्यासह राज्यात वाळूचा तुटवडा असल्याने शासनानेच यासाठी गरिबांच्या घरकूल योजनेला अडथळा येऊ नये यासाठी शासन निर्णय काढला होता. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला घरकुलासाठी किमान पाच ब्रास वाळू  विना रॉयल्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जारी केला होता. मात्र, याची अंमलबजावणी आज पर्यत कर्जत तालुक्यात  झालीच नाही. यासाठी अनेक लाभार्थ्यांन सह भास्कर भैलुमे या़नी  गटविकास अधिकारी  यांच्या कार्यालया समोर  पाच ब्रास वाळु मोफत मिळण्यासाठी आंदोलन करून  आणि संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी पत्रव्यवहार करूनही  प्रत्यक्षात हे काम आज पर्यत  झालेच नाही. त्यामुळे अनेकांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

इतर तालुक्यांचा विचार केला तर वाळू देण्यासाठी लाभार्थ्यांना परवानगीचे वाटप करण्यात आले आहे माञ कर्जत तालुक्यात आजुन पर्यत परवानेच देण्यात आले नाहीत   तालुक्यात खेड सिध्दटेक नागलवाडी दिघी बाभुळगाव जलालपुर इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात वाळु उपलब्ध आहे   येथील वाळू साठ्यातून घरकुल धारकांना शासकीय नियमा नुसार वाळू उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे . मात्र,तत्काळीन  तहसीलदारांनी हा प्रस्ताव तत्काळीन बीडीओंकडे आणि बीडीओंनी पुन्हा तहसीलदारांकडे ढकलला. दोन्ही अधिकार्‍यांच्या या टोलवाटोलवीत अनेक महिने  लोटली तरी अद्याप लाभार्थ्यांना वाळूचा एक कण हि मिळू शकला नाही. त्यामुळे हजारो  लोकांच्या स्वप्नातील घर अधुरे राहिले आहे. यामध्ये संबंधीत विभागाच्या  अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांची यादी तहसीलदारांना पाठवायची असून त्यांनी त्यांच्या घराच्या बांधकामाची स्थिती पाहून गरजेनुसार वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे.

यासाठी शासानाने शासन निर्णयही जारी केला आहे. असे असले तरी या निर्णयाला कर्जत तालुक्यात  मात्र संबधित प्रशासना कडुन केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर सध्या वाळू मिळविण्यासाठी प्रचंड कसरत करण्याची वेळ आली आहे. वाळूचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मंजूर अनुदानात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे लाभार्थ्यांसाठी मोठे दिव्य स्वप्न होऊन बसले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासाठी काही पावले उचलावीत, अशी मागणी  भास्कर भैलुमे यांनी केली आहे.अन्यथा पुन्हा घरकुला वाळु मिळण्यासाठी घरकुल धांरका सह पाच ब्रास वाळु मोफत मिळण्यासाठी  तहसिलदार यांच्या दालनातच आंदोलन करण्यांचा इशारा भास्कर भैलुमे यांनी दिला आहे