कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय; शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होतेय कमी

सध्या पुण्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात सध्या ४ हजार ८४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  पुणे:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू ओसरताना दिसून येत आहे. शहरामध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. तसेच सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात होते. परंतु अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या पुण्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात सध्या ४ हजार ८४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  कोरोनाची सद्यस्थिती

  शहरात गेल्या २४ तासात ३४९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ लाख ७१ हजार ५७७ वर पोहचली आहे.
  पुणे शहरात दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  यामध्ये २१ रुग्ण शहरातील आहेत तर १२ रुग्ण शहराबाहेरील आहेत आतापर्यंत ८ हजार ३६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
  दरम्यान ६९९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
  आजपर्यंत ४ लाख ५८ हजार ३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर ७ हजार ८७१ स्वॅब तपासणी करण्यात आली.
  शहरात सक्रिय रुग्ण संख्या ४ हजार ८४२ इतकी आहे यापैकी ७२१ रुग्ण गंभीर आहेत.
  तर १३७२ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत .
  अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.