‘यांना’ न्याय मिळवून देण्यासाठी ‘नगरसेवक’ बनले सुरक्षारक्षक

निषेध म्हणून महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नगरसेवक वंसत मोरे व साईनाथ बाबर यांनी मुख्य सभेत थेट सुरक्षा रक्षकाच्या वेशाभूषेत सभेस हजेरी लावली.

‘यांना’ न्याय मिळवून देण्यासाठी ‘नगरसेवक’ बनले सुरक्षारक्षक

पुणे: जेव्हा कंत्राटी सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरसेवक (Corporator)सुरक्षा रक्षक बनतो. पुणे(Pune) महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्व साधारण सभेत ही घटना घडली आहे. शहरातील ठेकेदार पद्धतीने सुरक्षेचे काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकले. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अचानक कामावरून काढल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवा निर्माण सेनेचे नगरसेवक वंसत मोरे व साईनाथ बाबर यांनी मुख्य सभेत थेट सुरक्षा रक्षकाच्या वेशाभूषेत सभेस हजेरी लावली. सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचले. महानगरपालिके केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी हात फलक घेऊन ”महापौर १० वर्षापासून महानगरपालिकेची सेवा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे संसार उघडयावर आणू नका” ‘पुण्याला सुरक्षित ठेवणार्या सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्याच सुरक्षित नाहीत’. आशयाचे फलक ही मुख्यसभेत दाखवण्यात आले.