निवड झालेले कुस्तीगीर संघ उत्तर प्रदेशातील अमेठी येथे स्पर्धेसाठी जाणार

  इंदापूर : येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाने आयोजित केलेल्या २३ वर्षे वयोगटाखालील पुरुष व महिला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत यशस्वी झालेल्या कुस्तीगीरांच्या संघांची निवड १६ ते २० सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेशातील अमेठी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

  येथील शिवन्या लॉन्सच्या हॉलमध्ये ही निवड चाचणी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या ६३० कुस्तीगीरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गर्दीची विभागणी व्हावी यासाठी चार मॅटची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, तांत्रिक सचिव बंकट यादव, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० पंचांनी निवड प्रक्रिया पार पाडली. बाबा लिमण व प्रशांत भागवत यांनी स्पर्धेचे समालोचन केले.

  मधुकर भरणे, हनुमंत कोकाटे, बाळासाहेब ढवळे, पोपट शिंदे, नवनाथ रुपनवर, पिंटू काळे, राजेंद्र चोरमले, महेंद्र रेडके, नाथा मारकड व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवानराव भरणे सहकारी पतसंस्थेने सर्व कुस्तीपटू, पंच आदींच्या भोजनाची सोय केली होती. शिक्षक दिनाचे औचित्य साधून कुस्ती प्रशिक्षक मारुती मारकड व शरद झोळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित बाळासाहेब लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार निवड चाचणी स्पर्धेचा निकाल असा : 

  फ्री- स्टाईल – वजन गट निहाय विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – (५७ किलो) पै. सौरभ इगवे, (६१किलो) पै. सुरज कोकाटे,(६५ किलो) पै.सौरभ पाटील,(७० किलो) पै.रविराज चव्हाण,(७४ किलो) पै.प्रथमेश गुरव,(७९ किलो) पै.समीर शेख,(८६ किलो) पै.बाळू बोडके,(९२ किलो) पै.ओंकार जाधवराव,(९७ किलो) पै.सुनील खताळ,(१२५ किलो) पै.आदर्श गुंड.

  ग्रीको रोमन – (५५ किलो) पै.मोहन रोकडे,(६० किलो) पै. सद्दाम शेख,(६३किलो) पै.भाऊसाहेब सदगीर,(६७ किलो) पै.नाथा पवार,(७२किलो) पै.ओंकार पाटील,(७७ किलो) पै.गोकुळ यादव,(८२ किलो) पै.अनिकेत जाधव,(८७ किलो) पै.मनोज कातोरे,(९७ किलो) पै.सुरज गायकवाड,(१३० किलो) तुषार डुबे.

  फ्री- स्टाईल (महिला) (५० किलो) किर्ती गुडलेकर, (५३ किलो) स्वाती शिंदे,(५५ किलो) विश्रांती पाटील,(५७ किलो)दिशा कारंडे,(५९ किलो) भाग्यश्री फंड, (६२ किलो) सोनाली मंडलिक, (६५ किलो) सृष्टी भोसले,(६८ किलो) वेदान्तिका पवार,(७२ किलो) सानिका पवार,(७६ किलो) प्रतीक्षा बागडी.