मेंढरांना काठीने बेदम मारहाण, सोडविण्यासाठी आलेल्या मालकालाही मारहाण

मेंढरे चारण्यासाठी आल्याच्या कारणावरून दोन अनोळखी महिला आणि आरोपी कांबळे याने हातातील काठीने मेंढरांना बेदम मराण्यास सुरुवात केली.

    पिंपरी: मेंढरे चरण्यासाठी आणल्याच्या कारणावरून तीन जणांनी चार मेंढरांना काठीने बेदम मारहाण केली. यात मेंढरे जखमी झाली. मेंढरांना सोडविण्यासाठी आलेल्या मालकालाही मारहाण करण्यात आली. देहूरोड येथील सैन्याच्या मोकळ्या जागेतील कचरा डेपो येथे ही घटना घडली.

    मल्हारी बापू गलांडे (वय १८, रा. चिंचोली, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी महिला आणि कांबळे याचा मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गलांडे हे रविवारी आपली मेंढरे चारण्यासाठी देहूरोड येथील सैन्याच्या मोकळ्या जागेतील कचरा डेपो येथे घेऊन गेले होते. त्यावेळी गलांडे यांच्या तोंड ओळखीच्या कांबळे या व्यक्तीच्या मुलाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मेंढरे चारण्यासाठी आल्याच्या कारणावरून दोन अनोळखी महिला आणि आरोपी कांबळे याने हातातील काठीने मेंढरांना बेदम मराण्यास सुरुवात केली. आरोपींना अडविण्यासाठी गलांडे गेले असताना त्यांनाही काठीने मारत जखमी केले. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.