राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत आहेत ; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

नागरीकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केली पाहिजे असे प्रत्युतर मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना दिले

    पुणे : महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करीत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे झाेपुन राहतात, घराबाहेर पडत नाहीत अशी िटका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली अाहे.
    कोरोनाची सद्यस्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते.

    राज्य सरकार दुजाभाव करीत असल्यानेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि कोविडच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससून रूग्णालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार कोणतेही काम करीत नाही, अशी टीका मुळीक यांनी केली.मुळीक म्हणाले, ‘१ मे पासून शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. नागरीकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केली पाहिजे असे प्रत्युतर मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना दिले