राज्य शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करावी पोल्ट्री व्यावसायिक संघाची मागणी

मंचर ः पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कार्यवाही करुन आर्थिक मदत करावी. अशी मागणी राज्य पोल्ट्री व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर आणि राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केली आहे.

 मंचर ः    पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कार्यवाही करुन आर्थिक मदत करावी. अशी मागणी राज्य पोल्ट्री व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर आणि राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात प्रकाश तापकीर म्हणतात कि  गेल्या १६ ते १७ वर्षे शेती व्यवसायाबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी व त्यांची तरुण मुले पोल्टड्ढी व्यवसाय करीत आहेत. गेल्या तीन ते चार महिने देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यात कोरोना विषाणू बाबत समाज माध्यमात अनेक अफवा उठल्याने हा व्यवसाय जवळपास बंद पडला आहे. पोल्टड्ढी  व्यवसायिकांनी या काळात जे कंपन्यांशी करार करुन  पक्षी सांभाळले होते ते पक्षी काही कंपन्यांनी नेले नाहीत. तर काहींनी ते पक्षी वाऱ्यावर सोडून द्यायला सांगितले. तर काही कंपन्यांनी बाजारातील अफवांमुळे अतिशय अल्प/कमी किंमतीला पक्षी उचलले.मात्र गेली दोन ते तीन महिने झाले तरी काही कंपन्यांनी पोल्टड्ढी मालकांचे पेमेंट दिले नाही. कोरोना, लॉकडाऊनची विविध कारणे सांगुन पेमेंट देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्टड्ढी व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल व रोजगार निर्माण झालेली आहे. राज्यातील पोल्टड्ढी व्यवसायात असलेल्या कंपन्यांना आपल्या माध्यमातून समज देऊन ज्या पोल्टड्ढीमालकांची पेमेंट दिलेली नसतील अशा कंपन्यांना समज देऊन शेतकऱ्यांचे पेमेंट मिळवून देण्यासाठी मदत व सहकार्य करावे. अशी मागणी पोल्ट्री व्यावसायातील तज्ञ आणि राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केली आहे.