जुन्नरच्या पूर्व भागाला वादळचा तडाखा

जुन्नर : तालुक्यातील औरंगपूर, जाधववाडी, निमगाव सावा,साकोरी, बेल्हे या गावांना मंगळवार रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे घराचं तसेच शेतातील

जुन्नर : तालुक्यातील औरंगपूर, जाधववाडी, निमगाव सावा,साकोरी, बेल्हे या गावांना मंगळवार रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे घराचं तसेच शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाला आहे. निमगाव सावा येथील भापकर वस्तीवरील बाळू भापकर, पांडुरंग भापकर, संभाजी भापकर यांच्या घराची कौले उडून गेली आहेत. गणपत घोडे यांच्या पपई च्या बागेचे नुकसान झाले आहे.
या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक विजेचे खांब या वादळाने पडले आहेत. वादळाची तीव्रता एवढी भयानक होती की, विजेचे लोखंडी खांब सुद्धा या वादळाने मधून वाकले आहेत. मंचर- निमगाव सावा रस्त्यावरती मोठे भाबळीचे झाड पडल्यामुळे हा रस्ताही वाहतुकी साठी बंद झाला आहे.