कोरोनाने गेलेले तरुण होती देशाची ताकत : मकरंद पाटील

  ओझर्डे/समीर मेंगळे : रुग्णांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे. पण दुर्दैवाने कोरोनोच्या आलेल्या या दुसऱ्या लाटेच्या महामारीत वयाच्या ५० च्या आतील तरुण वर्गात रोगप्रतिकार शक्ती असतानाही या महाभयंकर रोगाने त्यांच्यावर अटॅक केला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने शेकडो कुटुंबांचे आधार गेल्याने अनेक कुटुंबे निराधार झाल्याचे दुःख होत आहे. त्यासाठी गावात कोरोनोचा शिरकाव होऊ नये, याची काळजी गावातील सरपंच सर्व सदस्यांसह गाव कारभाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी घेऊन शासनाच्या आदेशांचे पालन करावे.

  गावोगावी विलगीकरण कक्ष तयार करुन त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्विकारली पाहिजे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. ते खानापुर ता.वाई येथील विलगीकरण कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शक करताना बोलत होते.

  पाटील पुढे म्हणाले, गेल्या मार्च २०२० च्या पहिल्या कोरोनो लाटेने संपूर्ण राज्याला वेढा टाकला. त्यात काही समजण्याआधीच अनेक नातेवाईक मित्र बाधित निघाल्याने अनेकांचे मृत्यू झाले. अशा या विचित्र आजाराचे परिणाम संपूर्ण राज्याने भोगले आहेत. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग काय करु शकतो. हे गेली १५ महिने अनुभवतो आहे. खानापुर या गावातील कर्ती-धर्ती चांगली माणसे गेली. याचे दुःख आहे. पहिल्या लाटेचा वाईट अनुभव घेऊन आपण आता दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत.

  सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी आहे. याआधी फारच रुग्ण होते. त्यावेळी गावे लॉक करून रुग्णसंख्या आटोक्यात आणली. पण दुसऱ्या लाटेवेळी आपण सगळेच गाफील राहिलो. प्रशासनाने घालून दिलेले नियम प्रत्येकाने झुगारून टाकले. होम आयशोलेशन पध्दतीने आपला घात झाल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे वयोवृद्धांपेक्षा तरुणांचा मृत्यूचा आकडा वाढला. मृत तरुण हे या देशाची शक्ती होती. सध्या गावात रुग्ण नसला तरी गाफील राहू नका. येणाऱ्या तिसऱ्या लाटेची काळजी घ्यावी लागेल.

  उद्यापासून वाईची बाजार पेठ सुरु होणार आहे. तेथे होणारी गर्दी ही कोरोनोला आमंत्रण देणार आहे. हे नक्कीच दोन महिन्यानंतर येणारी तिसरी लाट ही लहान मुलांवर येणार आहे. त्यालाही आपल्या सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. येथील ग्रामस्थांना उपकेंद्र हवे आहे. त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन मकरंद पाटील यांनी बोलताना दिले.

  विलगीकरण कक्षास अशोक कृष्णा जाधव यांनी १० हजार रुपयांची मदत दिली तर धर्माजी परबती जाधव यांनी २५ स्टिमर भेट दिले आहेत. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महादेव मस्कर, शशिकांत पवार, अनिल जगताप, संतोष पिसाळ, माजी सरपंच किरण काळोखे, डॉ.विजय ठोंबरे, डॉ.गुरव, डॉ.वाय.एस. शिंदे, महिला तलाठी शिर्के, मुख्याध्यापक जाधव, सरपंच पुजा जाधव, माजी सरपंच दिलीप मंडले, सदस्य अशोक जाधव, प्रकाश जाधव, सोपान जाधव, पुजा जाधव, अर्चना भोसले, अर्चना जाधव, अनिता पवार, आशा अंगणवाडी सेविका ग्रामसेवक सुधीर जाधव, ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते.