Bribe Case in Akola
प्रतीकात्मक फोटो

पिंपरी: दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टारला एसीबीने साडे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. वडगाव मावळ येथील दस्त नोंदणी कार्यालयात काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे. जितेंद्र बडगुजर असे पकडण्यात आलेल्या सब रजिस्टारचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एसीबीने सांगितले.

एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसेवक जितेंद्र हे वडगाव मावळ येथील रजिस्टार कार्यालयात सब रजिस्टार आहेत. यातील तक्रारदार यांनी दस्त नोंदणीसाठी अर्ज केला होता. दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण देखील झाली. पण त्या झालेल्या दस्तावर गोल शिक्के मारून देण्यासाठी लोकसेवक जितेंद्र यांनी तक्रारदार यांच्याकडे साड़े सात हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीत बडगुजर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत लोकसेवक जितेंद्र यांना साडे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.