धक्कादायक! पतीनेच प्रेयसीच्या मदतीने केली मुलाची आणि पत्नीची हत्या ; पाटस येथील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या काही तासांत पूर्ण

सचिन सोनवणे याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी लिना हिचा खून केला, हे मुलगा ओम आणि वैष्णवी हिने पाहिले होते, मात्र मुलगा हे सगळ्यांना सांगणार असल्याने त्याने मुलगा ओम याचाही खून करून मृतदेह आत्महत्या केलेल्याचा बनाव करीत गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला. मुलगी वैष्णवी हीने हा प्रकार कोणाला सांगणार नाही, अशी म्हणाली म्हणून ती वाचली, मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर घटना संशयास्पद वाटली .

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे एका सात वर्षाच्या मुलासह आईने गळफास घेऊन आत्महत्या नसून त्या महिलेच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीच्या मदतीने आपल्या सात वर्षांच्या मुलाची आणि पत्नीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.याप्रकरणी पती सचिन दिलीप सोनवणे (रा.पाटस ता.दौंड,जि.पुणे) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,

    लिना सचिन सोनवणे (वय ३५ ) कुमार ओम सचिन सोनवणे (वय ७, दोघेही स्वराज व्हॅली अपार्टमेंट रा. पाटस ता.दौंड जि.पुणे ) या दोघांचा मृतदेह मंगळवारी ( दि. २७ ) गळफास घेतलेल्या स्थीतीत मुलगी वैष्णवी हिने पाहिले होते, मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता, यवत पोलिसांनी सखल चौकशी केली असता ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. सचिन सोनवणे याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी लिना हिचा खून केला, हे मुलगा ओम आणि वैष्णवी हिने पाहिले होते, मात्र मुलगा हे सगळ्यांना सांगणार असल्याने त्याने मुलगा ओम याचाही खून करून मृतदेह आत्महत्या केलेल्याचा बनाव करीत गळफास घेतलेल्या स्थितीत लटकवला. मुलगी वैष्णवी हीने हा प्रकार कोणाला सांगणार नाही, अशी म्हणाली म्हणून ती वाचली, मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर घटना संशयास्पद वाटली .पोलिसांनी सखोल चौकशी करीत मुलगी वैष्णवी हीला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्याने आत्महत्या प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान पोलिसांनी सचिन दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले आहे . त्याच्या प्रेयसीचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.