pani purvtha vibhag

शहरामध्ये अनेक भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच शहरातील पाणीपुरवठा अनेक वेळा खंडीत होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना चार-पाच दिवस पाणी मिळत नाही. गढूळ पाण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला प्रशासनाने गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे मान्य केले आहे. तर दुसरीकडे लगेचच हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा (water supply department) सुरू आहे. त्यामध्येही शहरातील अनेक भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याकडे १५ प्रश्‍नाची लेखी उत्तरे मागविली होती. ती उत्तरे देण्यासाठी तांबे गेल्यामहिन्याभरापासून टाळाटाळ करत होते. आज अखेर महापालिका (Muncipality) भवनमध्ये अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, (deputy mayor) पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक हर्षल ढोरे, राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे आदी उपस्थित होते. त्यामध्ये रामदासतांबे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना गोड गोड उत्तरे देत वेळ मारून नेली.

शहरामध्ये अनेक भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच शहरातील पाणीपुरवठा अनेक वेळा खंडीत होतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना चार-पाच दिवस पाणी मिळत नाही. गढूळ पाण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला प्रशासनाने गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे मान्य केले आहे. तर दुसरीकडे लगेचच हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. पाण्याची चाचणी केली असून सर्वच ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. तर गढूळ पाणीपुरवठा का झाला, यावर प्रशासनाने पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा हवाला दिला आहे. तसेच पाण्याची वाहिनी फुटणे, नागरिकांच्या घरगुती टाक्‍या स्वच्छ नसल्यामुळे पाणी गढूळ होत असल्याचेही सांगितले आहे.

करोनाच्या काळामध्ये इतर साथीचे आजार पसरू नये यासाठी पाण्यातून विषाणूसंसर्ग होणार नाही यासाठी काय काळजी घेतली. यावर मार्च महिन्यापासून पाणीपुरवठ्याचे काम १०० टक्के उपस्थितीत केले जात आहे. तसेचशुद्ध पाणी नियमित तपासले जाते. जलशुद्धीकरण प्रकल्प, पंपिग वितरण व्यवस्था यासाठी लागणारी यंत्रणा सुस्थितीत आहे का यावर प्रशासनाने नादुरुस्ती बाबत वेळोवेळी बंद घेऊऩ आवश्‍यक ती दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. आवश्‍यक असलेल्या मशिनची निविदा काढली आहे.

पाणीपरुवठा विभागाचे विद्युत, यांत्रिकी, रासायनिक, उर्जा आदी प्रकारचे ऑडीट अद्याप केलेले नाही.याबाबत लेखापरिक्षण करण्यात येत असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षम असून ती पुणे महापालिकेपेक्षा चांगली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

नागरिकांनो प्रशासन सांगतय तुमच्याच टाक्‍या स्वच्छ करा

शहरामध्ये अनेकवेळा गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये प्रशासनाने सोयीस्कररित्या हात वर केले आहे. गढूळ पाणीपुरवठा हा नागरिकांच्या घरगुती टाक्‍या अस्वच्छ असल्याने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. एखाद ठिकाणी जलवाहिनी फुटली तर त्यामधूनही गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे म्हटले आहे.घरगुती टाक्‍या स्वच्छ नसल्याने पाणीपुरवठा गढूळ होत असल्याचे प्रशासन एकीकडे सांगत आहे. तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना तोंडी दिलेल्या उत्तरांमध्ये गढूळ पाण्यामुळे महापालिकेच्या टाक्‍या खऱाब होतात. त्या धुण्यासाठी जास्त पाणी खर्च होत असल्याचे सांगितले आहे.

नियमित पाणीपुरवठा नाहीच

धरणामध्ये शंभर टक्के पाणी असूनही शहरवासियांना पूर्ण क्षमतेने व रोज पाणी का नाही असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने जोपर्यंत अतिरिक्त ३० एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत दररोज पाणी देणे शक्‍य नसल्याचे सांगतिले आहे. अतिरिक्त पाण्यासाठी आंद्रा-भामा आसखेड प्रकल्प किंवा वाघोलीवरून पाणी आणण्याचे नियोजन असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.