प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपी सुरज याने फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देत गाडीच्या डिक्कीतील बाटलीत असलेले द्रव्य त्याने प्यायले.

पिंपरी: महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावल्या नंतर तिच्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करून चोराने आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेबारा वाजता इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडला. सुरज शेडगे (रा. खराळवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित चोराचे नाव आहे. याबाबत २० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज याने फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देत गाडीच्या डिक्कीतील बाटलीत असलेले द्रव्य त्याने प्यायले. आरोपी सुरज याने फिर्यादी महिला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.