कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये मोठा संसर्ग होण्याची शक्यता ; तात्काळ नियोजन करण्याची जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरणात ठेवलास रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीचयोग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील याबाबत सल्ला देण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात यावा. या नियंत्रण कक्षात ज्येष्ठ बालरोगतज्ञ व वद्यकिय समुपदेशकांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्काची जबाबदारी देण्यात यावी. लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यावी ? लहान मुलांना कोरोनाची झाल्यास काय करावे ? लहान मुलं मास्क वापरत नसल्याने पालकांनी कशी काळजी घ्यावी ? या व अशा इतर अनेक मुद्दयांबाबत तज्ञांच्या सल्लयाने मार्गदर्शनपर सूचना तयार करुन त्याचा प्रसार करावा, अशी सुचना सिमा सावळे यांनी केली आहे.

  पिंपरी: कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आगाऊ नियोजन करावे, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

  आपल्या लेखी निवेदनात सिमा सावळे म्हणतात, मार्च २०२० पासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: कोमॅार्बीड नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अक्षरशा: थैमान घातले आहे. या दुसऱ्या लाटेत २५ ते ५० या वयोगटात कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणत दिसत आहे.तरुण वर्गातील मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना विषाणूच्या या दुसर्‍या लाटेत, मोठ्या संख्येने लहान मुले देखील संक्रमित होत आहेत.

  नुकतेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे दोन तृतीयांश संसर्ग हा ५० वर्षांखालील वयोगटातील आहे, ज्यात ४१ – ५० वर्षे (१८.१५ %), ३१-४० या वयोगटात (२२.०९ % ) व २१-३० वयातील नागरिकांना (१७.५१ %), नवीन प्रकरणे नोंदवली गेलीआहेत. तसेच ० -१० वर्षातील ३.०४ % मुले आणि १० – २० वर्षांतील ६.०८ % पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांना दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. २०२० च्या
  तुलनेत परिस्थिती खूप वेगळी असल्याने लहान मुलांमधील कोरोणाचा संसर्ग प्रचंड चिंता वाढविणारी आहे.

  कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून
  दाखविली आहे. अशा स्थितीशी सामना करण्यासाठी आपली चोख व्यवस्था हवी व त्याचे योग्य आणि परिपूर्ण नियोजन करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मनपा हद्दीमधील रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज करावे लागणार आहेत. लहान मुलांचे व्हेंटिलेटर्स, पुरेशा संख्येने बाल रोग तज्ञ, सपोर्ट
  स्टाफ, लहान मुलांसाठी आयसोलेशन / कोविड केअर सेंटर्स, औषधांचा साठा, इतर उपकरणं इत्यादी बाबतीत प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये, याचे तातडीने नियोजन करण्यात यावे, अशी अत्यंत महत्वाची मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे.

  लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरणात ठेवलास रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीचयोग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील याबाबत सल्ला देण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात यावा. या नियंत्रण कक्षात ज्येष्ठ बालरोगतज्ञ व वद्यकिय समुपदेशकांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्काची जबाबदारी देण्यात यावी. लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यावी ? लहान मुलांना कोरोनाची झाल्यास काय करावे ? लहान मुलं मास्क वापरत नसल्याने पालकांनी कशी काळजी घ्यावी ? या व अशा इतर अनेक मुद्दयांबाबत तज्ञांच्या सल्लयाने मार्गदर्शनपर सूचना तयार करुन त्याचा प्रसार करावा, अशी सुचना सिमा सावळे यांनी केली आहे. एकवेळ स्वत:ला काही झाले तर आपण सहन करू शकतो पण आपल्या लहान मुलांना काही त्रास झाला तर ते दुखः असह्य होतं. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने काटेकोर व आगाऊ नियोजन करावे, अशी आग्रही मागणी सिमा सावळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.