बर्निंग कारचा थरार ! रस्त्यावर पार्क केलेल्या कारला लागली आग

पिंपरी : रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना पिंपरी चिंचवड़ मधील रावेत येथे सोमवारी रात्रि घडली. या आगीमध्ये कारचा पुढील भाग जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड़ वाल्हेकरवाडी रोडवर बालाजी हॉटेल जवळ रावेत येथे पार्क केलेल्या कारला (एमएच १२ / एल डी ३२२२) सोमवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीमध्ये कारचा पुढील इंजिनचा भाग जळून खाक झाला आहे. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहन चालक नितीन कोकरे, सिनियर फायरमन संतोष सारोटे, फायरमन अनिल माने, भूषण येवले, ट्रेनी सबऑफिसर शुभम सावंत यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पेटलेल्या कारच्या बाजूला आणखी तीन कार पार्क केल्या होत्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा धोका टळला आहे.