कोथरूड परिसरात रोकड लुटीचा थरार; विरोध करताच चोरट्यांनी चाकूने वार करून रोकड लुटली

ईस्माईल यांचा मनी ट्रान्सफरचा व्यावसाय आहे. त्यांचे भुसारी कॉलनीत ऑफिस आहे. त्याच परिसरात राहतात देखील. दररोज जमलेली रोकड ते दुसऱ्या दिवशी बँकेत भरत असतात. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांच्याकडे ५३ हजार रुपयांची रोकड होती. रात्री ऑफिस बंदकरून बॅगेत ठेवली आणि निघाले होते. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून जात होते. भुसारी कॉलनीतच मुख्य रस्त्यावर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले.

    पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात बँकेत पैसे भरण्यास निघालेल्या एकावर चाकूने वारकरून त्याच्याजवळील रोकड लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला आहे. गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने कोथरूड परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी ईस्माईल अजिसाब मुकेरी (वय ३७, रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, ईस्माईल यांचा मनी ट्रान्सफरचा व्यावसाय आहे. त्यांचे भुसारी कॉलनीत ऑफिस आहे. त्याच परिसरात राहतात देखील. दररोज जमलेली रोकड ते दुसऱ्या दिवशी बँकेत भरत असतात. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांच्याकडे ५३ हजार रुपयांची रोकड होती. रात्री ऑफिस बंदकरून बॅगेत ठेवली आणि निघाले होते. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून जात होते. भुसारी कॉलनीतच मुख्य रस्त्यावर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. तसेच, त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी विरोध केला. विरोध केल्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व त्यांच्याकडे असलेली ५३ हजार रुपायांची रोकड चोरून नेली. दरम्यान, याघटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यात आला. परंतु, चोरट्यांचा दुसऱ्या दिवशी देखील थांगपत्ता लागलेला नव्हता. रहदारी असणाऱ्या वेळेतच ही घटना घडल्याने कोथरूड परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.