Gangster procession on release from prison; Police sent him back to jail

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला शक्तीप्रदर्शमाचा नाद भारी पडणार आहे. गजा मारणेसह त्याच्या अनेक गुंडाना अटक झाल्यानंतर आता यांच्यावर थेट थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. जेलमधुन सुटल्यावर काढलेल्या गजा मारणेच्या जंगी मिरवणूकीच्या ताफ्यातील ३०० गाड्यांनी टोल बुडवला होता. यामुळे पोलिस आता थेट खंडणी वसुल केल्याची कारवाई करणार आहेत.

    पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला शक्तीप्रदर्शमाचा नाद भारी पडणार आहे. गजा मारणेसह त्याच्या अनेक गुंडाना अटक झाल्यानंतर आता यांच्यावर थेट थेट खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. जेलमधुन सुटल्यावर काढलेल्या गजा मारणेच्या जंगी मिरवणूकीच्या ताफ्यातील ३०० गाड्यांनी टोल बुडवला होता. यामुळे पोलिस आता थेट खंडणी वसुल केल्याची कारवाई करणार आहेत.

    कुख्यात गुंड गजानन मारणे तळोजा कारागृहातून बाहेर आल्यानंतर कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजानन मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला.

    या मिरवणुकीत जवळपास ३०० गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

    टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सर्व वाहने पुढे नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे आता पोलिसांकडून गजा मारणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.