संकट काळात इतरांच्या उपयगी पडणे हाच खरा मानवता धर्म : आ. संग्राम जगताप

अहमदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश सध्या चिंतेत आहे. या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन, पोलीस यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. लॉकडाऊन तसेच अन्य कारणाने सर्वत्र

अहमदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश सध्या चिंतेत आहे. या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन, पोलीस यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. लॉकडाऊन तसेच अन्य कारणाने सर्वत्र रक्ताचाही तुटवडा वाढला आहे. अशा परिस्थि तीत गरजू रुग्णांवरील लाखो शस्त्रक्रियाही थांबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नगर शहरात झालेले महारक्तदान शिबीर अनेक रुग्णांना जीवनदान देणारे ठरेल. हे सर्व रक्तदातेही समाजासाठी कोरोनायोद्धेच आहेत. लॉकडाऊनमध्ये नगरमधील विविध संघटना, संस्थांनी जोखीम पत्करून गरजूंना मदतीचा हात दिला. संकटकाळात इतरांच्या उपयोगी पडणे हाच खरा मानवता धर्म आहे. हे अहमदनगर मर्चंटस बँक व शिबिरासाठी परिश्रम घेणार्या सर्व संस्थांनी दाखवून दिले,असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

नगरमधील विविध सामाजिक संघटना,संस्थांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँकेने प्रायोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन बडीसाजन मंगल कार्यालयात आ.संग्राम जगताप व मर्चंटस बँकेचे व्हा.चेअरमन सुभाष बायड यांच्या हस्ते करण्यात आले. सोशल डिस्टन्सींगचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास मर्चंटस बँकेचे संचालक अजय मुथा,मोहन बरमेचा,संजय बोरा,संजय चोपडा, अमित मुथा,कमलेश भंडारी, सी.ए.असो.चे माजी अध्यक्ष सुशिल जैन,मिलिंद जांगडा आदी उपस्थित होते.

-संदीप बायड यांचा सत्कार

या शिबिरातील प्रत्येक रक्तदात्याला जितो अहमदनगरतर्फे मास्क दिल्याबद्दल गौतम मुनोत यांचा तर सॅनिटायजर दिल्याबद्दल संदीप बायड यांचा सत्कार करण्यात आला.सुभाष बायड म्हणाले की,नैसर्गिक आपत्ती,देशावरील संकटकाळात मर्चंटस बँकेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे.दरवर्षी आचार्यश्रींच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येते. आताच्या कोरोना काळात रक्त तुटवडा वाढला आहे.त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची अडचण ओळखून या शिबिरासाठी बँकेने पुढाकार घेतला.धनेश कोठारी यांनी स्वागत केले. सी.ए.किरण भंडारी यांनी प्रास्ताविक केले. या शिबिरात एकूण ४९३ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.