दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यातच जीवनाचे खरे समाधान

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गनीभाई शेख यांचे प्रतिपादन

अहमदनगर:  विश्‍व मानवाधिकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अज्जू शेख व अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी अल्ताफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक गनीभाई शेख व विश्‍व मानवाधिकार अल्पसंख्यांकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवेद शेख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शोहेब खान,शोहेब जहागीरदार,आनंद चव्हाण आदि विश्‍व मानवाधिकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

विश्‍व मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने नागरिकांच्या न्याय,हक्कासाठी कार्य सुरु आहे. सामाजिक कार्याची दखल घेत युवकांना संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असल्याची भावना नवेद शेख यांनी व्यक्त केली. वंचित घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यास नेहमीच कार्यरत राहणार असल्याचे नुतन जिल्हाध्यक्ष शेख व सय्यद यांनी सांगितले.स ्वातंत्र्यसैनिक गणीभाई शेख यांनी दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यातच जीवनाचे खरे समाधान असून,या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे चालू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक करुन नुतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.