जेवण दिले नाही म्हणून हॉटेल चालकासह दोघांना मारहाण

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील घटना शिक्रापूर : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे लॉकडाऊन मुळे बंद असल्याने हॉटेल बंद असताना हॉटेल चालकाने जेवण दिले नाही म्हणून हॉटेल चालकासह अन्य दोघांना

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील घटना

शिक्रापूर  : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे लॉकडाऊन मुळे बंद असल्याने हॉटेल बंद असताना हॉटेल चालकाने जेवण दिले नाही म्हणून हॉटेल चालकासह अन्य दोघांना दगडाने मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण जखमी झाले असून मारहाण करणाऱ्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील हॉटेल माथेरानचे चालक किरण साकोरे हे हॉटेलमध्ये असताना गावातील कैलास ननवरे हा युवक हॉटेलमध्ये आला आणि जेवण मिळेल का असे विचारले त्यावेळी साकोरे यांनी हॉटेल बंद आहे त्यामुळे फक्त पार्सल मिळेल असे सांगितले होते. त्यावेळी कैलास याने मला येथेच जेवायचे आहे माझी जेवायची व्यवस्था तू येथेच करायची असे बोलून वाद घालून शिवीगाळ, धक्काबुक्की करू लागला यावेळी गावातील रामदास भंडारी व सुखानंद तांबे हे मध्ये आले असताना कैलास याने तुम्ही कोण मधी येणारे असे म्हणून त्या दोघांना देखील दगडाने मारहाण केली. यामध्ये भांडण सोडविणारे भंडारी व तांबे हे दोघे देखील जखमी झाले आहे. याबाबत किरण तान्हाजी साकोरे रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कैलास सुबान ननवरे रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.