वाघोलीत दुचाकीस्वार पाण्यात वाहून गेला

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे दोन दिवसांपासून व रात्री विजेच्या कडकडासह पडलेल्या जोरदार पावसाने तरुण वाहून जात मृत्यूमुखी पडला असल्याची घटना रात्री घडली. यामध्ये पुणे-नगर महामार्गावरून रात्री तरुण दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना कावेरी हॉटेल जवळील ओढयात वाहत जाऊन निमित अशोक अहेरवाल (वय २१) याचा मृत्यू झाला.

बांधकाम व्यवसायिकांनी नैसर्गिक स्रोत बुजवल्याने हानी
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे दोन दिवसांपासून व रात्री विजेच्या कडकडासह पडलेल्या जोरदार पावसाने तरुण वाहून जात मृत्यूमुखी पडला असल्याची घटना रात्री घडली. यामध्ये पुणे-नगर महामार्गावरून रात्री तरुण दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना कावेरी हॉटेल जवळील ओढयात वाहत जाऊन निमित अशोक अहेरवाल (वय २१) याचा मृत्यू झाला. तसेच याच ठिकाणी चार ते पाच दुचाकी वाहून गेल्या आहेत. शासकीय बांधकाम खाते व पीएमरडीए खात्याच्या दुर्लक्षितपणामुळे वाघोलीत ओढ्या,नाल्यावर झालेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या अतिक्रमणामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

वाघोली परिसरात पुणे-नगर महामार्गावर, वाघोलीतील लोकवस्त्यांमधील रस्त्यांवर मोठ्या पावसाचे पाणी वाहत आहे. तर भैरवनाथ मंदिरांमध्ये व इतर मंदिरांमध्ये तसेच लोकवस्त्यांमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. पुणे-नगर महामार्गावर ठिकठिकाणी पाणी वाहू लागल्याने रात्रीपासून वाघोलीत वाहतूक कोंडीला वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे.

वाघोलीत बांधकाम व्यवसायिकांनी नैसर्गिक स्रोत बुजवल्याने पावसाळ्यात हानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पीएमआरडीएने त्वरित पंचनामा करून कारवाई केली नाही तर आम्ही स्वतःजेसीबी व इतरत्र यंत्रणा लावून नैसर्गिक स्रोत ओढे,नाले पूर्ववत करू. यावेळी कायदा सुवस्थेची परिस्थितीती निर्माण झाली तर संबंधित पीएमआरडीएचे अधिकारी जबाबदार राहतील.

-सर्जेराव वाघमारे,पंचायत समितीचे सदस्य