उदरनिर्वाहासाठी गाडी चोरीची अनोखी शक्कल

दोघांनी या तीन गाड्या नाना पेठेतील नरेंद्र मोटर्सला विकल्या. कागदपत्र दोन दिवसांनी देतो, असं सांगितलं. भाड्याची मुदत संपल्यानंतर सदर बाईक परत करणे आवश्यक असताना त्या परत न केल्यानं दुकान मालकानं संबंधित व्यक्तिकडं फोनवर संपर्क केला असता, आज देतो, उदया देतो अशी उडवाउडविची उत्तरे देत नंतर फोन बंद करून टाकला.

    पुणे : प्रेम विवाह केल्यानं घरातून काढून टाकलं. उदरनिर्वाहाचं काही साधन नसल्यानं गरज भागविण्यासाठी एक चुकीचं पाऊल तुरंगवासाची वाट ठरलं.घरच्यांना प्रेम विवाह मान्य नसल्यानं अरिष धवल त्याच्या बायकोसोबत वेगळा राहत होता. वेगळा राहत असताना हाताला काम वैगेरे मिळत नव्हतं. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न धवलसमोर होता. त्यातूनच त्यानं एक वेगळी शक्कल लढवत श्राईड इंडीया प्रा. ली. कंपनीच्या वेबसाईटवरून ऑनलाइन तीन बाईक भाड्यानं भाड्याने घेतल्या. त्याच्यासोबत त्याचे मित्र अंबरीश विगणुर हा या गुन्ह्यामध्ये सामील होता. या दोघांनी या तीन गाड्या नाना पेठेतील नरेंद्र मोटर्सला विकल्या. कागदपत्र दोन दिवसांनी देतो, असं सांगितलं. भाड्याची मुदत संपल्यानंतर सदर बाईक परत करणे आवश्यक असताना त्या परत न केल्यानं दुकान मालकानं संबंधित व्यक्तिकडं फोनवर संपर्क केला असता, आज देतो, उदया देतो अशी उडवाउडविची उत्तरे देत नंतर फोन बंद करून टाकला. फिर्यादीस त्यांची फसवणूक झालेची खात्री झाल्यानं दि. २९/८/२०२१ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून, तक्रारी प्रमाणे सखोल चौकशी करून, तक्रारदाराची फसवणूक झालेचे निष्पन्न झालेने, तपासानंतर या तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. पुढची चौकशी सुरू आहे.