भाजीपाला बाजार आता नियमित सुरू

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळे भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार नियमितपणे सुरू करण्याचा िनर्णय घेण्यात अाला अाहे. रविवारपासून हा बाजार टप्प्या टप्प्याने सुरू ठेवण्यात येणार हाेता, या

पुणे :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळे भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार नियमितपणे सुरू करण्याचा िनर्णय घेण्यात अाला अाहे. रविवारपासून हा बाजार टप्प्या टप्प्याने सुरू ठेवण्यात येणार हाेता, या निर्णयात दाेन िदवसांत बदल केला गेला अाहे.
मार्केट यार्ड येथे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार अाहे. हा बाजार रविवारी ( ता. ३१ मे ) िदड महीन्यानंतर सुरू झाला हाेता. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी एकाच िदवशी सर्व अाडत्यांचे गाळे सुरू न ठेवता एकाच िदवशी पन्नास टक्केच गाळे सुरू ठेवण्यात अाले. साेमवारी देखील निर्णयाची अंमलबजावणी झाली, परंतु ग्राहकाने पाठ फिरविल्याने बाजारातील उलाढालीवर परीणाम झाल्याचे स्पष्ट झाले.
 
साेमवारी  छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्ाे पदाधिकारी अािण  बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांची बैठक झाली. या बैठकीत मंगळवारपासून ( ता. २ जुन )  फळे, भाजीपाला व कांदा बटाटा विभागातील सर्व गाळे दररोज चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व विभागांमध्ये प्रत्येक आडत्या ने किती गाड्या शेतमाल  विकाव्यात याचे बंधन काढुन टाकण्यात अाले अाहे.  सर्व विभागांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या खरेदीदार अािण व्यापाऱ्यांना पहाटे 4 वाजता बाजार आवारात सोडण्यात येणार अाहे.
 
खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे बाजार आवारात सोडल्यानंतर सर्व आडते बंधूंनी त्यांच्या गाळ्यावर आलेल्या किरकोळ खरेदीदारास बाजार समितीचा परवाना काढण्यासाठी सहकार्य करावे. त्यासाठी त्या विभागातील गटप्रमुखास संबंधित व्यापाऱ्याची ओळख करून द्यावी. व त्यानंतर बाजार समितीचे गटप्रमुख सदर खरेदीदार व्यापाऱ्यास बाजार समितीचा परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहीती अाडते असाेसिएशनचे अध्यक्ष िवलास भुजबळ यांनी िदली.
 
 बाहेर हाेणाऱ्या िवक्रीवर कारवाई करण्याची मागणी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार बंद ठेवण्यात अाल्यानंतर शहराच्या साेलापुर रस्ता, िसंहगड रस्ता, सातारा रस्ता अादी रस्त्यांवर सकाळी माेठ्या संख्येने टेम्पाे, जीपमधून शेतमाल अाणून त्याची विक्री केली जात अाहे. ही भाजीपाला िवक्री बेकायदेशीर असुन, ती थांबविण्यात यावी अशी मागणी अाडते असाेिसएशन अािण कामगार युनियनने केली अाहे. यासंदर्भात बाजार समितीचे प्रशासक देशमुख, अाडते असाेिसएशनचे भुजबळ, राजेंद्र काेरपे, कामगार युनियनचे संताेष नांगरे, राजेंद्र चाेरघे अादींनी अायुक्त गायकवाड यांची भेट घेतली. अनधिकृतपणे चालणाऱ्या अािण वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला िवक्रीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.