कोयत्याने वाहनाची तोडफोड; सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

शिवनेरी कॉलनीत दोन दुचाकीवरून आरोपी आले. तेथे फिर्यादीच्या चारचाकी वाहनाची कोयता, चॉपर, दगडाने तोडफोड करू लागले. त्यामुळे यांनी घरातून पाहिले. तू खाली ये तुला दाखवतो आम्ही काय आहे, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले. आरोपींनी बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ केली. पोलिसांना काही सांगितल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे जोरजोरात ओरडून कोयता फिरवत दहशत निर्माण करून दुचाकीवरून निघून गेले. सहायक पोलीस फौजदार सतीश कांबळे तपास करीत आहेत.

    पिंपरी:  कोयता, चॉपर, दगडाने वाहनाची तोेडफोड करून टोळक्योने राडा घातला. पिंपळे गुरव येथील शिवनेरी कॉलनी परिसरात गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी २० ते २५ वयोगटातील सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष यशवंत वाघमारे (वय ४८, रा. शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनेरी कॉलनीत दोन दुचाकीवरून आरोपी आले. तेथे फिर्यादीच्या चारचाकी वाहनाची कोयता, चॉपर, दगडाने तोडफोड करू लागले. त्यामुळे यांनी घरातून पाहिले. तू खाली ये तुला दाखवतो आम्ही काय आहे, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले. आरोपींनी बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ केली. पोलिसांना काही सांगितल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे जोरजोरात ओरडून कोयता फिरवत दहशत निर्माण करून दुचाकीवरून निघून गेले. सहायक पोलीस फौजदार सतीश कांबळे तपास करीत आहेत.